STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

4  

Pavan Kamble

Romance

ती मला का आवडते...

ती मला का आवडते...

1 min
738

काय आहे तिच्या नजरेची नशा

मला खोल नशेत ती बुडवत जाते

हृदयाची जणू माझ्या

ती तार छेडून जाते


ती मला का आवडते

उलगडलं का हे रहस्य

पाहून तिला माझ्या ओठी

का येते ये स्मितहास्य


कोण ती कोण जाणे

स्वप्नातही माझ्या रोज तीच

न चुकता हे येने जाणे

असेल ते माझं प्रेमात फसने


असते आजूबाजूला खूप

मुलींची गर्दी

त्या गर्दीतही ती मला

का आवडते


का कळेना मनाला माझ्या

भास तिचा की ही 

प्रेमाची नशा

विचारतो मनाला प्रत्येक्षात आज

ती मला का आवडते

 ती मला का आवडते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance