तिचा लडिवाळा
तिचा लडिवाळा
*रोज सकाळी गुलाब*
*ती येण्याची वाट बघायचा*
*तिच्यासाठीच तो सुगंध दरवळायचा*
*मोगराही तिच्यासाठीच*
*उमलायचा*
*तिच्या गालावरचं हसू*
*पाहून फुलायचा*
*पण ती फक्त गुलाबालाच बघायची*
*जवळ जावून त्याला अलगद मिठीत घ्यायची*
*तिचा लडिवाळ पाहून*
*मोगरा जरा रूसायचा*
*रागात तिला म्हणायचा*
*कधीतरी एक नजर*
*माझ्याकडेही बघत जा*
*प्रेमाणे मलाही कवेत घेत जा*
*तू हजारदा त्या गुलाबाला पाणी घातलेस तरी*
*तो तुला काटेच टोचणार आहे*
*अगं या मोगऱ्याच्या गजऱ्याशिवाय*
*तू कुठे सुंदर दिसणार आहे*
*तुला सांगू का.....*
*तुझ्या वेणीला गजऱ्याचाच लळा लागतो*
*म्हणून तर दृष्ट लागेपर्यंत*
*आरसा तुला एकसारखा*
*टक लावून बघतो*

