तिचा चंद्र
तिचा चंद्र
तिने शब्दांपुढे,
शब्द टाकला
ओळींचे सर
आपोआप उलगडत गेले,
कविता बनत गेली
शब्द खिडकीच्या बाहेर पडले,
पानांमधून खाली सांडले,
नदीच्या पाण्यात चिंब भिजले,
वार्याने अलगदच उचलले,
पिकलेल्या ढगांमध्ये मिसळले,
शब्दांचा पाऊस पडला,
आणि ढग विरघळून गेले
ती हसली,
तिचा चंद्र
तिला दिसू लागला

