तिचा चेहरा जेव्हा मला दिसतो...
तिचा चेहरा जेव्हा मला दिसतो...
तिचा चेहरा जेव्हा मला दिसतो
मी मनातल्या मनात खूप हसतो
तिच्या चेहऱ्यावर मी खूप मरतो
पण तिला हे सांगायला खूप भितो
तिचा चेहरा जेव्हा मला दिसतो
मी तिलाच एकटक पाहत बसतो
तिला कळलं की मी तिच्या चेहऱ्याकडे बघतो
मी लगेच तिथून सटकतो
तिचा चेहरा जेव्हा मला दिसतो
मी लगेच तिचा पाठलाव करतो
ती वळून जेंव्हा बघते
तेंव्हा उगाच मी अडखळतो
तिचा चेहरा जेव्हा दिसतो
तुला गुलाब द्याव म्हणतो
तिला गुलाब देण्याआधीच
का काटा मला तोचतो
पण खरंच जेव्हा तिचा चेहरा मला दिसतो
मी सगळंच विसरून जातो
मी तिचं स्वप्न पाहतो
फक्त तिलाच स्वप्नात पाहतो...
