थोर तुझे उपकार
थोर तुझे उपकार
स्थितप्रज्ञ स्वराज्य जननी जिजाऊची गाथा,
सुसंस्कारमूर्ती छत्रपती शिवाजीची माता.।।ध्रु।।
सिंदखेड बुलढाणा जिल्ह्यात जन्मली,
वडील लखुजीराव,आई म्हाळसाबाई पोटी.
लाचार दुष्ट निजामशाहीच्या चाकरीत,
मुघल साम्राज्याची जुलमी जगरहाटी.।।१।।
झाली दैवयोगे शहाजी भोसल्यांची धर्म पत्नी,
तलवारबाजी,घोडेस्वारी, युद्ध कौशल्य नारी.
थोर तुझे उपकार सर्वधर्मसमभाव दृष्टी चोख,
हिंदवी स्वराज्य स्थापना घेतली दिव्य भरारी.।।२।।
दृष्टांच्या संहारा शूर शिवाजी जन्माला,
सत्वगुणी,देशप्रेमी,धर्मनिष्ठ, बुद्धीमान.
पुरोगामी,आदर्श,खंबीर प्रेरणास्रोत,
c,प्रभावशाली दृढनिष्ठ,स्वाभिमान.।।३।।
परस्त्री मातृ मानण्याचे दिले बाळकडू,
जातीभेद, अंधश्रद्धेचा तिमीर जाळत.
केली पारतंत्र्य,लाचार जुलमी राजवट उध्वस्त,
डावपेच, गनिमी कावा शत्रूला झुंजवत.।।४।।
