थंडीच्या थंड हवेचा तडका
थंडीच्या थंड हवेचा तडका
पहाटे पहाटे मला जाग आली
गाडी माझी मंदिरी पळाली
गारठ्याची हवा नाकी झोंबली
ऊब घरट्याची तेंव्हा कळाली
वाटेत परतताना शेकोटी भेटली
मायेची साक्ष मला पान्हा पटली
मोहाची सय्यम सीमा सुटली
क्षणात मी ती टायर जळकी गाठली
ज्वाला झेपावत्या आकाशी चालता
उष्णतेचा उबारा हाती चाटला
मज स्पर्श त्या उबेचा प्रिय वाटला
जणू संसार वाटे मध्ये नवा थाटला
अवती भोवती चिटपाखरू नसता
एकाकी पहाटे मी वाटेत एकटा उभा
क्षण भर वाटले मला पहाटे पहाटे
अवती भोवती भरली असावी आत्म्यांची सभा
ज्वालेत त्या मला दर्शन वेगळेच घडले
सभोवती जणू अनेक हात ज्वालेस भिडले
दिवास्वप्न हे पहाटे पहाटे मज दिसले
डोळे फाडून मी बळे बळे भयेच पाहिले
सुटलो सुसाट सोडूनि ती शेकोटी
गाठण्या घरच्या मालकिणीची कोठी
आता कळले काय असते साठी
असता संसार सुखाचा पाठी
घरी येता गप गुमान मी आस्थेने
चादर उबेची अंगावरी ओढीली
भीतीची भीती क्षणात घरी सांडली
खरेच परमेश्वरानेच ही संसाराची माया मांडली...!!!!
