STORYMIRROR

Pravin Bopulkar

Inspirational

4  

Pravin Bopulkar

Inspirational

ताकद मतदानाची

ताकद मतदानाची

1 min
361

ताकद मतदानाची बोटाले लागली शाई,

तै मी लय खुस झालतो,

मतदार राजा झालो म्हणुन बेज्या जोमात आल्तो,


परतेक उमेदवार लागत जाय माया पाया,

मनात वाटले भाई अपुन भी छा गया,

ब्यानर वर ब्यानर अन भल्ले छापले फोटो,

भपका नुसता निवळणुकी पुरता भौ,


मंग म्हणे मले सांगु नोको,

मतदानाचा हक्क देला मले संविधानानं,

झाले सगळे समान,


आमच्याच मतदानाने एकदा निवळुन आले की

पायत नाई बापा असे होतात बेमान,

एका बोटाच्या जोरावर देश बदलते मतदार राजा,

पण देश बदलणाऱ्याच्याच बोकांडीवर कर्जाचाच बोजा,


फक्त मतदानाच्या दिवशी राजा अन पाच वर्ष भिकारी,

आश्वासनाचा पाऊस पाळतात, सत्तेचे शिकारी,

कितीक जोर लावा आपुन,

पण पळतोच गळेहो तोंडघशी,


लोकशाहीच्या या देशात,

लोकशाहीलाच झाली अर्धशिशी,

पुन्हा एकदा एक होऊन जाऊदे मतदार राजा ची शक्ती,

दाखवुन देऊ फीक्की पळते

मतदारांच्या ताकदीपेक्षा पैशाची शक्ती.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational