सवयी...
सवयी...
अयोग्य सवयी सोडण्यासाठी, सवय लावा चांगली
चुकीच्या सवयीने होते नुकसान, सवय बदलावी आपली
उधवस्त परिस्थितीत,आनंदी राहण्याची सवय लावावी,
अडथळे शोधण्यासाठी नाही, अडथळ्यातून संधी शोधावी
तुम्हाला तुम्ही कसे हवे, सराव करा त्याचा,
ती सवय होईल तुमची, आपोआप विचार कृतीचा
चांगल्या सवयींची बेरीज, चारित्र्य घडवते,
चांगल्या सवयीच, यशाकडे नेते