STORYMIRROR

Dr. Varsha Raotole

Romance

3  

Dr. Varsha Raotole

Romance

स्वप्नातील फुलराणी

स्वप्नातील फुलराणी

1 min
33

(अष्टाक्षरी काव्य )


कसं काय सांगू तुला

सखी गं तूच साजणी,

माझी आहेस तू तूच

स्वप्नातील फुलराणी


डोळे तुझे गं बोलके

तू आहे मनमोहिनी,

तू माझी प्रेयसी तूच

स्वप्नातील फुलराणी


तुझ्यासाठी रेशीम गं

घेऊनी आलो पैठणी,

घालुनी तू दिसते गं

स्वप्नातील फुलराणी


आली माझ्या जीवनात

बनून माझी संगिनी,

देशील ना गं साथ तू

स्वप्नातील फुलराणी


सार्थक झाले जीवन

जीवनी गं तू येवूनी,

तू अर्धांगिनी तूच गं

स्वप्नातील फुलराणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance