"भाऊ बहिण"
"भाऊ बहिण"
1 min
59
नात्यांमध्ये एक
अनमोल नातं,
जसं नाजूक नाजूक
हिरव गार गवताचं पातं.
कधी असतं रुसणारं
कधी हसणारं,
कधी समजून घेणारं
तर कधी समजावून सांगणारं.
रक्षाबंधनाला आणखी
जवळ येणारं,
राखीतून त्यांचं प्रेम
व्यक्त होणारं.
मी तुझी बहीण
तू माझा भाऊराया,
वाढतच जावो नेहमी
आपल्यामधील माया.
