-स्त्रीभ्रूणहत्या
-स्त्रीभ्रूणहत्या
कसं सांगू आई तुला
मला सुद्धा जगायचंय
तुझ्या डोळ्यांनी पाहिलेलं जग
मला सुद्धा बघायचंय
पंख पसरून उडणाऱ्या
पाखरांसारख उडायचंय
अथांग अशा आभाळाला
कवेत मला भरायचंय
चिंब भिजवणाऱ्या पावसात
बेधुंद होऊन नाचायचंय
मधाळ आशा आठवणींना
एक एक करून वेचायचंय
मीही असं ऐकलं होतं
आई तू पण स्त्री आहेस
उद्याच्या जगाला घडवणार
रोपट्याच बी आहेस...
काही नको आई मला
फक्त तुझी साथ हवी
जसं अंधाराला उजेड द्यायला
दिव्याची वात हवी ...
