पावसात कधीकधी
पावसात कधीकधी
पावसात कधीकधी
भलतंच काही घडतं
डोळ्यांसोबत नकळत
आभाळही रडतं..
मग एकेक सरींसोबत
सुरु होतो आठवणींचा प्रवास
सोबतीला धावुनी येतो
मातीचा सुगंधी सुवास..
तेंव्हा नकळत गालावरून
पावसाचे थेंब ओघळतात
त्याच थेंबामध्ये कुठेतरी
आसवांचे रंग मिसळतात..
मग कुठेतरी मनात
सुरु होते विचारांची घालमेल
असं वाटतं जणू
चालू झालायं मान्सूनचा सेल..
इतक्या पटापट जुने दिवस
डोळ्यांसमोरून सरतात
परत परत त्याच आठवणी
मनामध्ये घर करतात ..
तेंव्हाकुठे अचानक मागून
डोक्यावर एक छत्री येते
हातात हात येतो अन
तिच्या अस्तित्वाची खात्री होते ..
अचानक कुठूनतरी
जोराचा वारा येतो
ती छत्री, तो स्पर्श
बघता बघता उडून नेतो..
पुन्हा मग ओलीचिंब नजर
प्रत्येक थेंबात तिला शोधते
पावसात कधीकधी
माझ्यासोबत असेच घडते..
पावसात कधीकधी...
