STORYMIRROR

Preetshri Ghadge

Inspirational

3  

Preetshri Ghadge

Inspirational

स्त्री, नारीशक्ती..सलाम

स्त्री, नारीशक्ती..सलाम

1 min
291

"स्त्री" म्हणजे नेमकं काय ?

स्त्रीला समाजाने नेहमीच दुय्यम लेखलं हाय....


स्त्रीला कधीच कमी लेखू नका...

बघता बघता पुरूषांच्या खाद्याला लावलाय खांदा.....आता बघतच बसा


माता जिजाऊने उचलले स्त्रीबद्दल हिंमतीचे पाऊल

ज्यामुळे सुरू झाली जगाच्या बदलाची चाहूल


नसता घडला शिवबा....जिजाऊ मातेविना

ते म्हणतात ना प्रत्येक पुरूषाच्या मागे असतो स्त्रीचा हात खरा....!


म्हणतात लग्नासाठी स्त्री हवी

मग, का बदलतात पोटाला येणा-या मुलीच्या बाबतीत तुमच्या चवी ?


का, बघत नाही तुम्ही मुलीमध्येच मुलगा....?

बघितला असता तर आज भारत असताच काही वेगळा !


जिथे जपान, कॅनडाचे युवा करताहेत प्रगती

तिथे आपला भारत अटकलाय अजून बलात्काराच्या दुर्गतीत....


मनापासून वाटते सगळे एकत्र येऊन बदलू भारत

पण एक एकटे राहिलात तर, नेहमीच बसू हारत


मुजरा त्या राणी लक्ष्मीबाई आणि सावित्रीबाई फुलेना

ज्यांनी शिकवले स्त्रीला पायावर उभं राहायला....

जे जग ही पाहतच राहिला


चला विसरून जाऊ स्त्री पुरूष या जाती

आणि घेऊ देश बदलण्याचे काम हाती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational