मराठी भाषा
मराठी भाषा
जशी निसर्गाची निर्मळ छाया
तशीच माय मराठीची आम्हावर माया😊
जशी आई जिवापाड जपते मुलाला👩🏻🍼
मातृभाषेने स्थान दिधले जन माणसात आम्हाला🙂
जगी जरी मान इंग्रजी बोलिला
तरी मराठी एवढी गोडवी नाही कोणत्या भाषेला😉
हि ओळख मराठी माणसाची इथल्या भूमीची
हि भाषा वर्णीते थोरवी अवघ्या महाराष्ट्राच्या इतिहासाची🤏😎
कधी होऊन पोवाडा, रास शृंगारते लावणी
ज्ञान साधणेलाही माय मराठी देते संजीवनी😇
अभंग किर्तन नाचे होऊन तल्लीन अमृते गोड🪘
अर्थानाही येते स्वरूप होता शब्द फोड
रांगल्या पावलानी इवल्याश्या मुखाने पुटपुटले प्रथम मी आई🗣️
त्याचवेळी जीभेवर रेगाळली जणू साखरेवीण गोडवी😊
काना मात्रा उकार वेलाटी तुझा सौंदर्याचा साज
जणू भासते नटून थटून सजलेली अप्सरा घरंदाज💎
अशी माझी मराठी अमृते ही पैजा जिंके
अशी माझी मराठी शब्दानी मने जिंके🚩🚩
