|| स्री जीवन प्रवास ||
|| स्री जीवन प्रवास ||
जीवनाच्या वाटेवर चालतांना
अनंत काट्यांचे फास मी तुडवित आले,डगमगले घाबरले पण
तरिही स्वत: ला सावरले..
नसता कोणाचीही साथ
संघर्ष करित राहीले,
समाजाच्या धिक्काराचा
प्रतिकार मी करत राहिले..
एक स्त्री म्हणुन खुप झाल्या,
चिडवण्या पण तरीही न
डगमगता प्रत्येक गोष्टीचा सामना
मी हिमतीने करत राहिले....
स्त्री शक्तीची किमया दावुन
स्वत:चे रक्षण स्वत:च करित
राहिले, जिद्द उरात ठेउन
लढण्यासाठी पुन्हा
मी उभी राहीले....
अनंत संकटे झेलुन जीवनाशी
संघर्ष करून रणरागिणी
मी झाले, जीवनाच्या प्रवाहात
स्वत:ला सिध्द करून दाखविले
स्वत:ला सिध्द करून दाखविले....
