गरीबी
गरीबी
1 min
27.7K
एक पहाट अशीही असते निशब्द
मनात अंधारलेली
डोळ्यातलं पाणी आटवुन दु:खाने पाखडलेली
ऊन्हाची चादर असते चटक्यांनी लख्तरलेली
पावसाची झड असते काकुळतेने बिखरलेली
एक भुक अशीही असते उपाशीपोटी करपलेली
घोटभर पाण्याच्या ओलाव्याने विझलेली
ठिगळाची ओंजळ असते अंगाशी कवटळलेली
अंथरूणाला माती असते गरीबीने झिरमिरलेली
एक दिवाळी अशीही असते उसण्या झगमगाटात फरफटलेली
मळकटलेल्या अंगाने रस्त्यांवरती विखुरलेली
चमचमत्या दिवाळराती काळोखात खुमसलेली
चार दिवसांच्या सनावळीत आशेने पाझरलेली
