STORYMIRROR

Shubhangi Kotwal

Abstract

3  

Shubhangi Kotwal

Abstract

सोनेरी पहाट

सोनेरी पहाट

1 min
528

निळ्या निरभ्र आकाशी सूर्यकिरणे पसरती !

देती चाहुल सुंदर सोनेरी पहाटेची 

पक्ष्यांचा किलबिलाट अन थवे दिसती आकाशी 


निळ्या निरभ्र आकाशी सूर्यकिरणे पसरती !

पानांवर दवबिंदू झळकती जणू टपोरे मोती 

पारिजात , जाई , जुई , शेवंती सुगंध पसरवती 

हिरव्यागार शेतांची जणू चादर पसरली 

मंदिरात शंखनाद आणि टाळ्यांचे सुर गाजती 

दूर कुठेतरी झोपडीत दिसे शेकोटी पेटलेली 


निळ्या निरभ्र आकाशी सूर्यकिरणे पसरती !

कुठेतरी चाहूल दुचाकी वाहनांची 

दूध , वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्यांची 

कुणी निघे प्रवासी तर कुणी कामावरती

अशी ही शांत वेळ मनाला सुखावून जाई 


निळ्या निरभ्र आकाशी सूर्यकिरणे पसरती !


Rate this content
Log in

More marathi poem from Shubhangi Kotwal

Similar marathi poem from Abstract