संत आले घरा
संत आले घरा
संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥1॥
कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥
काया कुरवंडी। करुन ओंवाळून सांडी ॥2॥
तुका म्हणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥3॥
संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥1॥
कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥
काया कुरवंडी। करुन ओंवाळून सांडी ॥2॥
तुका म्हणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥3॥