संघर्ष...
संघर्ष...


पिंजऱ्यात असेल आज जरी
हाच जगण्याचा अंत नाही,
संघर्ष न करताच उडणे
हे या पंखांनाही पसंत नाही...
झाले अनेक घाव मन-देहावर
पण माझ्या अस्तित्वाची ही हार नाही,
मोडू शकेल सामर्थ्याला अशी
शस्त्राला कोणत्याच धार नाही...
असतील अंधाऱ्या वाटाही पुढे
शंका यात तीळमात्र नाही,
रोखेल उगविण्यास स्वप्न किरणांना
कोणतीच अशी काळोखी रात्र नाही...
काय हरवणार कोण आता
मनाला जगाचे भय नाही,
थांबतील अडथळ्यांनी प्रयत्न
पावलांची ही सवयच नाही...
प्रज्वलित होण्यास रोखणारा
अंधार आता जिवंत नाही,
संकटांमुळे विझेल अशी अशक्त
संघर्षाची ही ज्योत नाही...