संघर्ष रमाईंचा
संघर्ष रमाईंचा
बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल
ठेऊन चालणारी ती रमाई
आयुष्याच्या अनंत अडचणींना
तोंड देणारी धन्य ती माऊली
भुकेलेल्या अनाथ मुलांसाठी
विकलं जीन स्वतःच सोन
वाटत तितक सोप नाही
बापहो रमाई होन
समाजाच्या भल्यासाठी केली
जीने स्वतःच्या जीवाची माती
म्हणूनच जळताहेत आज
तिच्या नावाने दिव्यात वाती
नवरा परदेशातून आला म्हणून
जिच्याकडे नेसायला नव्हती चांगली साडी
त्या जोडप्याच्या संघर्षामुळे आज
समाजाला मिळतेय बंगला गाडी माडी
