STORYMIRROR

Tanisha Chaudhari

Romance

3  

Tanisha Chaudhari

Romance

समुद्रकिनारी तू असावा सोबती

समुद्रकिनारी तू असावा सोबती

1 min
325

सुर्यास्तावेळी समुद्रकिनारी 

तू असावा सोबती 

हाती तुझा हात अन्

निरव सायंकाळ भोवती 

खळाळणाऱ्या लाटा सोनेरी रेती 

उमटती तुझ्या पाउलखुणा 

अन् त्यावरी पाऊले माझी

गप्पांची मैफिल भारी 

रंगावी त्या किनारी


लाटांच्या सूरातही 

मन ते रमावे

न बोलता आले जरी 

डोळ्यांत मन गुंतावे


अथांग सागरासम 

असावा प्रवास आपुला

रेखीव शंखशिंपल्यांसारख्या 

सुंदर आठवणी फुलाव्या 

साक्षीदार प्रवासाची 

बोलकी होडी असावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance