समृद्ध कोकण
समृद्ध कोकण
माझं मायेचं आजोळ कोंकण ,
साठवोनी ठेवियल्या जश्या ,
कुंचल्यासारखं.......!!
काजू, फणस, अळंबे,
आंबा नि नारळाच्या बागा,
खाऊ आम्ही भरभरूनी - कोंकणी मेवा ....!!
खारा -सुका बोंबिलाचं सारवण
सपाटूनी खाई पोटं भरभरून,
भोळी-भाबडी माय-बाप लेकरं
लाविती माया कवटाळून ....!!
कोकणी बोली लई भारी,
काय तो गोडवा मालवणीचा ,
बालचमूंची लाकडी खेळणी ती.
सावंतवाडीची काय अन् किती
डोंगर -दर्याचा राजा उभा,
राहूनी पाही चाकरमान्यांकडं.!