समृद्ध कोकण
समृद्ध कोकण
माझं मायेचं आजोळ कोकण,
साठवोनी ठेवियल्या जश्या,
कुंचल्यासारखं.......!!
काजू, फणस, अळंबे,
आंबा नि नारळाच्या बागा,
खाऊ आम्ही भरभरूनी.
कोकणी मेवा ....!!
खारा -सुका बोंबिलाचं सारवण.
सपाटूनी खाई पोटं भर -भरून,
भोळी-भाबडी माय-बाप लेकरं.
लाविती माया कवटाळून ....!!
कोकणी बोली लई भारी,
काय तो गोडवा मालवणीचा,
बालचमुंची लाकडी खेळणी ती.
सावंतवाडीची काय अन् किती
डोंगर -दर्याचा राजा उभा,
राहूनी पाही चाकरमान्यांकडं.!