STORYMIRROR

VRUSHALI Sontakke

Inspirational

3  

VRUSHALI Sontakke

Inspirational

सिंधू ताई सपकाळ

सिंधू ताई सपकाळ

1 min
156

अनाथांची माय माऊली होतीस तू

कित्येक लेकरांची साऊली होतीस तू

रोपट्याचा आधारवड होतीस तू

प्रेमाचा,वात्सल्याचा अर्थ होतीस तू


जन्मानेच चिंधी म्हणून हिनवलीस तू

छळ,अपमान निखाऱ्यात चमकलीस तू

रुतले काटे तरी अश्रू न ढाळलेस तू

येणारे कित्येक सुरे धैर्याने झेललेस तू


सहनशिलतेला मूर्तीरूप दिलेस तू

सासर छळाला चपकर दिलास तू

कुशीत लेकरू गाईला माय केलस तू

गोठ्यात नंदनवन फुलवलेस तू


काळोखात निरंतर चाललीस तू

तोडलेल्या कळ्याना उचलत गेलीस तू

कोमेजलेली फुलांना हसवत गेलीस तू

उपटल्या रोपाची सिंधूधारा झालीस तू


मुक्या आसवांना शब्दरूप दिलेस तू

चिमुकल्या अश्रूंची मोती झेललेस तू

मारणा-यांना जगवून जगलीस तू

अश्रूंच्या तेलज्योतीने जग प्रकाशमय केलेस तू


ममता हृदयाच्या कोपऱ्यात जपलीस तू

हजारो दीपकांची छत्रछाया झालीस तू

परक्या लेकरांसाठी वणवण फिरलीस तू

पोटची आग शमवण्या चितेची चूल केलीस तू


नाते फक्त माय लेकरांचे उमगलेस तू

आज साऱ्या जगाची माय झालीस तू

कित्येक पुरस्कारांनी सजलीस तू

सोडले जरी हे जग,तरी हृदयात सर्वांच्या राहशील तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational