शुद्धता
शुद्धता
पाण्याचा उगम होतो
ते पाणी असतं निर्मळ
जसं जसं वाहत येतं
तशी त्यात होते भेसळ
बाळाचा जन्म होतो
शुद्धतेचा गुण पक्का
जसा जसा वाढत जातो
जाती धर्माचा शिक्का
धर्मही तसाच उगवला
शुद्ध आणि सदाचरणी
नंतर त्यात भेसळ झाली
अनेकांची त्यात भरणी
पाणी करुन घेतो शुद्ध
धर्मासाठी करतो युद्ध
पाण्यासारखे जेव्हा शिकू
माणूस म्हणून तेव्हा टिकू
