भक्तिशाही
भक्तिशाही
1 min
182
कोणाला देव मानले
प्रश्नच मिटत असतात
देवाने उघडा केला तरी
पांग फिटत असतात
भक्तिशाही असल्यावर
अकलेचा वापर शून्य असतो
देवाने केलेला अत्याचार
भक्तांना मान्य असतो
भक्त इकडं असतात
भक्त तिकडं असतात
इशाऱ्यावर नाचणारे
भक्त माकडं असतात....!
