शुद्ध ज्याचा भाव झाला
शुद्ध ज्याचा भाव झाला
शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ।।१।।
अवघी साधन हातवटी । मोले मिळत नाही हाटी ।।धृ.।।
अहो अापण तैसे व्हावे । अवघे अनुमानूनि घ्यावे ।।३।।
ऎसे केले सतगुरूनाथे । बापरखुमादेवी कांते ।।४।।
तेथे कोणी शिकवावे । सार साधूनिया घ्यावे ।।५।।
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्यल ठायीचे ठायी । ।६।।
तुम्ही तरुनी विश्वतारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।७।।
