शृंगार तुझा किती किती छान
शृंगार तुझा किती किती छान
लावंण्याचे रूप तुझे
किती किती छान
अंग अगं तुझे जसे गुलाबाचे पानं
श्रूंगार तुझा जसा ह्रुदयाला कळ
कुशितल्या निद्रेल
तुझ्या स्वप्नांचे दान
नजरेने केला तुझ्या
ईथे तिथे वार
पंख लाऊन गेला जसा
देहातुन प्राण
गालावरची खळी तुझ्या हसते किती किती गोड
पैंजण तुझ्या पायातली
हरवते भान
चांदण्याची वेणी त्याला
केवड्याचा हार
केस सोनेरी तुझे जसे
मोरपंखी रानं
अंगा भोवती पिंगा घालतो
हा वारा खोडकर
पहाट सावळी जसी
सनईची बिनं
दिसे यौवन तुझे पारिजाकाचे फुलं
गोरे गोरे रुप तुझे किती किती छानं
जगण्याला माझ्या आता
तुझाच आधार
तुझ्याविना आयुष्य माझे
सुकलेले पानं

