शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन
काळ्या आईचा तो लेक आज दिल्लीत बसला
हक्कासाठी स्वतःच्या तो सरकारला सुद्धा नडला.
अजून कितीक दिवस असं चाललं उपोषण,
आज उपाशी तो राजा जो जगाला देतो रे राशन..
कधी थंडीचा तो मारा, कधी पोलिसांची लाठी
जगाचा पोशिदा आज राहिला उपाशी,
कधी हार मानली नाही ,तो लढतच राहिला ,
माझ्या भिमाच्या संविधानाचं होतं बळ त्याच्या पाशी,
बस एवढेच मागणे पांडुरंगा तुझ्या पाशी हा जगाचा पोशिंदा
नको राहू देऊ तु उपाशी, नको राहू देऊ उपाशी...
