शब्दच उमजले नाही
शब्दच उमजले नाही
बोलायचे तिच्यासवे असते खूप काही,
सामोरा समोर मात्र शब्दच उमजत नाही..!
भेटण्याचे आमचे तसे अनेकदा बेत ठरले,
साद साद बोलण्यातच बरेच वर्ष सरले
काय बोलावे आता नेमकं समजत नाही,
बोलायचे तिच्या सवे असते खूप काही,
सामोरा समोर मात्र शब्दच उमजत नाही
वाटायचं तिला एखादी भेटवस्तू द्यावी,
एखादी छान movie दोघे मिळून पहावी,
विचारायची मात्र कधी हिम्मतच झाली नाही,
बोलायचे तिच्यासवे असते खूप काही
वाटायचं चार-दोन ओळी तिच्या साठी लिहाव्यात,
तिच्यावरच्या प्रेमकविता तिला देऊन पहाव्यात,
पण मनातले शब्द कधी कागदावर उतरलेच नाही,
बोलायचे तिच्यासवे असते खूप काही
सामोरा समोर मात्र शब्दच उमजत नाही..!

