सौभाग्याचा कुंकू
सौभाग्याचा कुंकू
सौभाग्याचा कुंकू मला
आयुष्याचे दान तुला
तुझ्यासाठी आले रे
सोडून माझ्या वडिलांचा तो बंगला
कधीपासून वाट बघते
तू येशील कुठल्या क्षणाला
तू माझा जराही विचार नाही केलास
आणि दुसरे घेऊन आलास
आधीच सांगायचं होतं ना
तू मला पसंत नाही
मी तुझ्यासोबत सोडून
आले नसते बाबा आणि आई
काय बोलू तुला आता
मला काही सुचत नाही
माझ्या जीवनात तुझ्याशिवाय
दुसरे कोणीच नाही
झाले गेले जा विसरून
कर तुझा संसार सुखाने
मी तर जीवन जगते
कलंकाचा तुझ्याच नावाने
