सायफाय
सायफाय
किती सूक्ष्म किती भव्य विज्ञानाची अलौकिक भरारी
दोन दिशांना गवसणी घालत चालली आहे.
एक दिशा आहे अति सुक्ष्माची तर
दुसरी आहे अतिभव्याची.
एका टोकाला अतिसूक्ष्म कणांच्या प्रक्रिया
तर दुसऱ्या टोकाला ब्रह्मांडाची व्याप्ती!
ब्रह्मांडाच्या साऱ्या गुपितांचा छडा लावल्याशिवाय
हे शास्त्रज्ञ थांबणार नाहीत . . .
पाण्याच्या रेणूत चिमुकला हायड्रोजनचा अणू
चंद्र पृथ्वीहून विशाल सविता तीन पिढ्या त्या जणू
अणू दिसे ना कुणा कुणी ना गेले सूर्यावर
किती सूक्ष्म हे चराचर किती भव्य हे चराचर
कधी सूक्ष्मदर्शकातून दिसे कधी दुर्बिणीचा वापर
किती सूक्ष्म हे चराचर किती भव्य हे चराचर