STORYMIRROR

Subhash Tondolkar

Abstract Others

3  

Subhash Tondolkar

Abstract Others

" सावली "

" सावली "

1 min
137

खूप बघितलेत 

कृत्रिम प्रकाशाने 

स्वतः ला वलयांकित करणारे

सोन्याने लगडलेले

कित्येक धनिक हात ,


बहुतांशी आत्मकेंद्रित 

स्वतः च्या ताटात 

सर्व काही वाढून घेणारे 

विकत घेतलेल्या 

प्रसिद्धीच्या विकृतीने ग्रासलेले

दांभिक औदार्याची

केवळ दवंडी देणारे ,


वृथा अभिमानाने

स्वतः ला तेजोरुप समजणारे 

अखेर थरथरत्या हाताला 

काठीचा आधार शोधणारे

मी खूप बघितलेत 

शेवटी मातीचा ढीग झालेले ,


मी तर एकच सूर्य पाहिलाय

सृष्टीचा अंकूर झाला 

इवल्या रोपट्याची ऊबही झाला 

अन्यायी,अत्याचारित ,अनैतिक 

बिनशींगांच्या राक्षसाचा वणवा झाला ,


कोणी कितीही वल्गना करो 

प्रखर सत्य प्रगट करणाऱ्या

अखिलज्ञाला झाकणारा हात 

अजून जन्मला नाही 

अन् तो कधी येणार ही नाही ,


हे पुष्कराक्षा 

करता आले तर

फक्त एक कर

आमच्यासाठी 

अखंड होरपळणाऱ्या

तुझ्या ओजस जीवासाठी

एक क्षण का होईना 

आईने दिलेल्या संस्काराने 

आम्हाला सृजनतेची सावली कर 

आम्हाला सृजनतेची सावली कर ---!



Rate this content
Log in

More marathi poem from Subhash Tondolkar

Similar marathi poem from Abstract