साथ हवी
साथ हवी
जगण्यासाठी वाट हवी ऐकण्यासाठी हाक हवी
तळमळ आहे वाटेत जगण्याच्या
झाल्या गेलेल्या चुकांना माफी हवी
सुरुवात कधीच नव्हती ना झाला शेवट कधी
प्रत्येक गोष्टीत खचत होतो तसाच
जशी वळण घेती जणू वाहणारी नदी
ना आपुलकी ना प्रेम ना कधी जिव्हाळा
ज्या गोष्टींची गरज हवी त्याच ना मिळे
माणसाच्या पावसाळ्यात माझा उन्हाळा
का अपेक्षा हव्या जगण्याला मला कुणाच्या
भंग होण्याऱ्या गोष्टी मनाला का टोचवाव्या
ना फरक पडला कुणा, पर्वा नाही मनाच्या