साथ देशील का ?
साथ देशील का ?
पावलो पावली साथ देशील का ?
पावलो पावली पाऊल आपलं
म्हणून पाऊल माझं सावरशील का?
रणरणत्या उन्हामध्ये छाया
माझ्यासाठी बनशील का ?
गोड गुलाबी थंडीमधलं
पांघरूण बनशील का ?
मी एक काटा आहे
तू काटा म्हणून राहशील का?
की, फुलाचा तोरा
माझ्यावरचंं गाजवशील का?
सरपण गोळा करता करता थकलास
तरी अशा संसाराचा राजा तू होशील का ?
का, गोळा केलेल्या सरपणावरती
तिरडी माझी काढशील का?
रात्री पांघरूणात येऊन
मिठीत घेशील का?
की, मिठीत मी आणि मनात
दुसरीला आणशील का?
सात फेऱ्यांच्या बंधनात
सात जन्म काढशील का?
आईबाप, भाऊ यांचं
प्रेम एकटाच पुरावशील का?
तुला देईन मी साथ
उन्हातान्हात पावसात
जास्त काही नको पण
मरू दे मला तुझ्या बाहुपाशात !!!!

