STORYMIRROR

Priya Shimpi

Others

5.0  

Priya Shimpi

Others

आईचं जीवन कसं असतं ?

आईचं जीवन कसं असतं ?

1 min
4.1K


आईचं जीवन कसं असतं ?

जसं बैंलांना जुंपलेलं गाडं असतं

उन्हातान्हात नांगर हाकायचं असतं .

येणाऱ्या पिकासाठी झटायचं असतं,

तयार झालेलं पीक "ति"च्या

नशिबातच नसतं !


आईचं जीवन कसं असतं ?

जसं चिखलात उगवतं कमल असतं.

स्वतः देठ असतं चिखलातलं

मात्र आपल्या फुलाला देत असतं

नवं चैतन्य , नवं धैर्य, नवं सौंदर्य

चारचौघात असामान्य , एक लाखमोलातलं !!


आईचं जीवन कसं असतं ?

अंधाऱ्यातली आपली ज्योत असते

स्वतः जळते दुसऱ्यांना प्रकाशित करते

जळता जळता ती भरपूर काही देऊन जाते

पण काही न घेता ती साऱ्या जगाला

ऋणी करून विझुन जाते !!

आईचं जीवन कसं असतं ?.......


Rate this content
Log in