सांताक्लॉजच्या कविता...
सांताक्लॉजच्या कविता...
भारतातल्या काही "सांताक्लॉजच्या" कविता....
१) प्रिय सर, तुमच्या अमेरिकेत येतो म्हणे... सांताक्लॉज लहानग्यांना वर्षाअखेर आनंदी करायला....हक्काने... प्रेमाने! आणि आमच्या इथे.... गेल्या ७० वर्षापासुन कित्येक "सांताक्लॉज" येऊन गेले.... पण तरीही मरतात... गरीब लाहानगे वर्षभरात "ऑक्सिजन" आणि "भात" वेळेवर न मिळाल्याने.... या आमच्या आदिम आणि महासत्ता बनणाऱ्या "इंडियात"!
२) भारतातल्या रस्त्यावर अपघात झाल्यावर.... लोकं मदत करायची सोडून.... फोटो आणि विडियो काढतात.... आपल्या आपल्या भारी मोबाईलच्या 20 मेगापिक्सल कॅमेऱ्याने.... न हळहळता..... आणि वाट पहात राहतात... लवकर न येणार्या "सांताक्लॉजची"!
३) आरोप सिद्ध होऊनही... इथले "सांताक्लॉज" लवकर देत नाहीत न्याय एखाद्या गरीब पिडीताला..... येतात निर्णय...... गरिबाची हाडे नदीत गेल्यावर.... किवा... मिळतो मोबदला त्यांचे.... जिने भणंग झाल्यावर!
४) बाजार भरवला जातोय शिक्षणाचा.... भरडले जातेय आयुष्य .... इथल्या कोवळ्या "सांताक्लॉजचे".... दरवर्षी! अस्तित्वातच नसलेल्या.... १०० टक्यांसाठी.... टक्यांचाही पुढे आहेत ते ताटकळत आहेत एका संधीसाठी.... झोपडीतली... आणि झेडपीतिल हुशार मुले!
५) अजूनही त्रास सहन करावा लागतो इथे जाती-पातीतून बाहेर पडून माणसे जोडणाऱ्या माणुसकीच्या "सांताक्लॉजला".... स्वतःच्याच समाजाकडून!
६) दर पाच वर्षांनी बदलतात किवा तीच राहतात आश्वासनांचे बहुरूपी "सांताक्लॉज".... पण कांही केल्या सुटत नाहीत गरिबांचे पुरातन प्रश्न.... बेकारानां नसते कुठलीच उमेद "सांताक्लॉजच्या" पाच वर्षाच्या कुठल्या तरी दुसर्याच विश्वात.... भरारी मारलेल्या कार्यकाळात...!
७) हे खर्या सांताक्लॉजा.... तुला जर यायचेच असेल तर... आमच्या खेड्या पाड्यात वसलेल्या भारतात ये! तुझ्या पोटलीत घेऊन ये गरीब लहानबाळांसाठी "ऑक्सिजन" आणि बासमती तांदूळाचा “भात", माणसा-माणसात खरे प्रेम, गरिब पीडितांना त्वरित न्याय, खऱ्या कला गुणांना वाव, आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी निस्वार्थपणे काम करणारे असंख्य.... " सांताक्लॉज"! ~
