सागरी किनारा
सागरी किनारा
निळ्या निळ्या आकाशी आज काळ्या ढगांचा दरारा....
भरून आलाय आज आसमंत सारा
बरसत्या सरी अन हा बेभान वारा
साक्षीला आहे आज हा सागरी किनारा.....
तिच्या आठवणी आज ताज्या झाल्या
पाणावले डोळे मग आल्या भरून धारा.
आमच्या प्रेमाचे पुरावे किती द्यावेत
साक्षीला आहे हा सागरी किनारा
जेव्हा जेव्हा पाऊस येईल... जेव्हा
जेव्हा पाऊस येईल....
मनात तुझ्या आठवणींची गर्दी होईल
भावनांना माझ्या कुणाचा सहारा ...?
तेव्हा खळखळत्या लाटा घेऊन येई मदतीला
हा सागरी किनारा..... हाच..... सागरी किनारा
