STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Romance

4  

Govardhan Bisen 'Gokul'

Romance

सागर किनारा

सागर किनारा

1 min
184

सागर  किनारा  मोहे माझे मन

मन  फिरतांना  खूप  मजा घेई |

घेई वेळ माझे ती येई भेटायला

भेटायला आल्यावर  दुरवर नेई ||१||


नेई सागराच्या  खेळत्या लाटेत

लाटेत सागराच्या न्हाऊन जाऊ |

जाऊ नंतर  बसायला एकांतात

एकांतात  खुपवेळ  बसून  राहू ||२||


राहू  करत गप्पा छान प्रेमाच्या

प्रेमाच्या चर्चेमध्ये  होई अंधार |

अंधार  झाल्यावर  दिसे चंद्रमा

चंद्रमा सोबत नभी चांदणी नार ||३||


नार  माझी तू होशील ना सखी

सखी साक्षीला आहेत चंद्र तारे |

तारे नशीबाचे  चमकणार माझे

माझे मनात वाहती प्रीतीचे वारे ||४||


वारे थंडगार वाहु लागले आता

आता संपवून भेट होऊया एक |

एक होऊ  कायमचे जीवनभर

जीवनभर  दोघेही  राहुया नेक ||५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance