STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Romance

4  

SANGRAM SALGAR

Romance

रोज वाटे

रोज वाटे

1 min
326

रोज वाटे

तुझ्याशी बोलावे

न बोलता

खूप काही सांगावे


न पाहता तुला

तूच दिसावे

पाहूनी जीवघेणा अबोला

त्यावर मनसोक्त हसावे


स्वप्नातही माझ्या

तू सोबती असावे

रोज वाटे

तुझ्याशी बोलावे


ओढ ही निराळी

नकळती जाणवावे

स्वतःच गालात हसूनी

मनमुराद अनुभवावे


सतत तुझ्याच विचारी

मनी गाणं गुणगुणावे

न असता तू सोबती

आठवणी रुपी तुच उरावे


बोलता तुझ्याशी

भान हे हरवावे

रोज वाटे

तुझ्याशीच बोलावे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance