STORYMIRROR

Shripad Tembey

Classics

4  

Shripad Tembey

Classics

रंग शब्दांचे

रंग शब्दांचे

1 min
452

रंग शब्दांचे ....

.“शब्द जर हळुवारपणे उधळले

तर फुलून येते प्रीती

शिंपले जर आपुलकीने

तर जुळून येतात नाती ।।

भावनेचा पांढरा रंग जर पेरला

तर अनुभवता येते शांती

काळजीपूर्वक पेरले जर शब्द

तर घडून येते विचारांची क्रांती ।।

शब्द जागवतात स्वप्न मनात

अन् देतात प्रोत्साहनाची थाप

शब्द वाढवतात सकारात्मकता

शब्दच मनात भरवून जातात ।।

मनामध्ये द्वेषाचे फुत्कार

पेटवतात धर्माच्या नावावर

माणुसकीच्या रोज होळ्या 

हो शब्दरुपी विषाला नसतो उतार।।

भावनाशुन्य रंग शब्दांचा

उत्पात माजवून जातो

तर हिरवा रंग शब्दांचा

जगणं समृद्ध करून जातो ।।

मोहक गुलाबी रंग प्रेमाचा

गुंतून मनात राहतो

तर शांततेचा पांढरा रंग

सर्वांनाच मनापासून भावतो।।

म्हणून मी म्हणतो

शब्दांना रंग असतो, रंग असतो”.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics