मी अनुभवलेला पाऊस
मी अनुभवलेला पाऊस
अचानक असाच एकदा पाऊस आला
माझ्या मनाला एकटाच बघून बाहेर घेऊन गेला
मनाने म्हटलं त्याला, बाहेर ओलं आहे फार
हलकेच घातला त्याच्या हातांचा हार
खरंतर अवचित येणे त्याचे आवडलं होतं मनाला
कारण खूप वाट बघितली होती प्रत्येक क्षणाला
थोडीशी धांदल झाली त्याच्या अकस्मात येण्याने
सावरायचं कसं हेच कळलं नाही त्याच्या अचानक येण्याने
चिंब भिजलो आम्ही दोघंही आठवणींच्या पावसात
ठरवलं होतं नाही जगायचं आठवणींच्या भूतकाळात
नाही नाही म्हणत कागदाच्या नावा केल्या
एकमेकांशी स्पर्धा करत सोडून दिल्या
जाऊन शाळेत पाहिलं नेहमीच्या बाकावर बसून
वर्गाच्या तुटलेल्या खिडक्यांन अन् फळ्याने पहिले हसून
माहित नाही त्या आठवणींमध्ये किती गेला वेळ
मन मात्र जुन्या आठवणींशी लपाछपीचा खेळ
पावसाच्या थेंबांनी अंगावर शहरे आले
पुन्हा आठवणींच्या जगात मला नेऊन टाकले
तेव्हाच ठरवले आता जगायचे नाही भूतकाळात
पण वर्तमान अडकून पडलाय अजूनही त्याच्या जाळ्यात
आहे आज पाऊस नव्या आठवणींचा एकदा पुन्हा
तरी मनात दडून बसला आहे पाऊस मात्र जुनाच
तरी मनात दडून बसला आहे पाऊस मात्र जुनाच......
