STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Comedy

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Comedy

राया माझं करा की वॅक्सिनेशन

राया माझं करा की वॅक्सिनेशन

1 min
399

शासनाच आलं बघा आलं नोटीफिकेशन

समद्या नागरिका कराया ओ वॅॅक्सिनेशन 

आला कंटाळा पाळून आयसोलेशन

राया माझं करा की वॅक्सिनेशन


लगबगीनं करा ओ राया करा रजिस्ट्रेशन

सर्च करा गुगलवर सेंटरचे लोकेशन 

कोविशिल्ड द्या मला नाहीतर द्या कोवॅक्सीन

राया माझं करा की वॅक्सिनेशन


घ्या सोबत आधार कार्ड कराया व्हेरीफिकेशन 

हाथ धूऊन, मास्क लावून करू या प्रोटेक्शन 

बुलेटवर जाऊ बसून, करा गाडीचे सॅनिटायझेशन

राया माझं करा की वॅक्सिनेशन


गोल गळ्याचा स्लीवलेस घालून करीन मी फॅशन

लस घेताना करा राया माझं फोटोसेशन

इन्स्टा, फेसबुकवर टाकून करीन सेलिब्रेशन 

राया माझं करा की वॅक्सिनेशन    


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy