रात्र मंथरलेली
रात्र मंथरलेली
भावनांनी भारलेली ही रात्र मंतरलेली..
त्या मोहमयी क्षणांनी चांदण्या अंथरलेली..!!
उन्मादी एक नजर नजरेस भिडलेली..
जादुई नयनांवर वेडा जीव जडलेली..!!
स्पंदनांचे दोन वारु वायु वेगे दौडलेली..
बाहुपाशांच्या शिखरी आवेगाने भीड़लेली.!!
प्रीतकुंड चेतवून अग्नि श्वासी विरलेली
खुल्या घन बटांतून मोरपिस फिरलेली..!!
गोडवा अंगी लेवुन रातराणी बहरलेली..
एक ओढ़ अनामिक लागून हुरहुरलेली..!!
भावनांनी भारलेली ती रात्र मंतरलेली..!!

