राजकारण
राजकारण
अख्या गावात झाडे तुम्ही लावली
विरोधकांची घरे तुम्ही ओस ठेवली
तुमची झाडे तुम्हलाच लक-लाभ
आजानी माझ्या अंगणात फुलवलीय आंब्याची बाग
तोंड बघून झाडे वाटली गेली
अर्ध गाव सावलीविना खाली
हद्द तर तेंव्हा झाली, कमाल तुमची झाली
अंगणातील माझ्या झाडाला घरी कोणी नसता रंगवून गेली
जन्मलो तस कधी नाली सफाई केलेली आठवत न्हाय
कुठे तुंबली तर कोठे बांधलीच न्हाय
सांडपाणी सगळं रस्त्यावर,पोरा जरा जपून टाक पाय
नुसतं फोडाफोडी राजकारण तुमचं भारी हाय
