STORYMIRROR

Gautami Kulkarni

Abstract Romance

2  

Gautami Kulkarni

Abstract Romance

राधेची साद

राधेची साद

1 min
4.0K


कृष्णा संयमी; कृष्णाकळा

अन् कृष्णाची चहूल,

व्याकूळ झाले अंतःकरण

साद तयास घालून,

कृष्ण स्पर्श मंद मधुर

कृष्णवेडी हुरहूर,

व्याकुळ झाले अंतःकरण

साद तयास घालून,

क्षणमात्र त्या आठवणी

पळभराचे स्पर्श

गुंतून गेले अतीव क्षण,

वेळा त्या आठवुनी,

व्याकुळ झाले अंतःकरण

साद तयास घालून

गुंतलेल्या मनाचे भान गेले हरपून,

तन ही कृष्ण,मन ही कृष्ण ,

कंठ आला दाटून ,

व्याकूळ झाले अंतःकरण.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Gautami Kulkarni

Similar marathi poem from Abstract