राधा कृष्ण
राधा कृष्ण
वेडीपीसी होऊनी राधा
शोधते तिच्या कृष्णाला
भक्तीत त्याच्या रंगुनी
विसरते ती स्वतःला
प्रत्येक क्षणी नाम जपुनी
पूजते तिच्या देवाला
तिच्या प्रीतीची व्यथा
कुणी सांगावी त्या कृष्णाला
कृष्णाच्या बासरीचे सूर
साद घालती राधेला
राधेकृष्ण मिलनाची
लागे चाहूल वृंदावनाला
निःस्वार्थ प्रेम त्यांचे
लावी वेड जीवाला
एकरूप होऊनी दोघं
शिकवती प्रेम जगाला

