प्रेम
प्रेम
1 min
277
प्रेम नाजूक नात्यांची गुंफण
प्रेम आनंदाची उधळण
प्रेम आठवणीत हसणं
प्रेम विरहात रडणं
प्रेम मनातील हुरहूरता
प्रेम मिलनाची आतुरता
प्रेम दोन जीवांच रंगणं
प्रेम एकमेकांत गुंतणं
प्रेम सुंदर जगाची ओळख
प्रेम मखमली नात्यांची पारख
प्रेम नात्यातील निखळता
प्रेम मैत्रितील अवखळता
प्रेम नजरेतील आत्मीयता
प्रेम दोन हृदयातील समीपता
प्रेम अविस्मरणीय आठवण
प्रेम आयुष्यभराची साठवण
प्रेम अतूट विश्वास
प्रेम ओथंबलेला श्वास
प्रेम नकळत वेडावणं
प्रेम देहभान विसरणं
