प्रेमकथा
प्रेमकथा
1 min
327
माझी वेडी प्रेमकथा
हीच माझ्या हृदयाची व्यथा
तिचं नि माझं भेटणं
नकळत जीव जडणं
तिचं ते निरागस हसणं
तिचं ते मनमोकळं बोलणं
माझ्या मिठीत लाजणं
मला असं वेड लावणं
मी तिच्यात रंगणं
एकमेकांत जीव गुंतणं
हृदयात लपलेले प्रेम हे
एक दिवस जगाला कळणं
जातीजातींतील भिन्नता
आमच्या प्रेमाची अमान्यता
एकमेकांपासून दूर जाणं
आतून हृदय जाळणं
दोन प्रेमवेड्या पक्ष्यांचं
हे निर्दयी जग सोडून जाणं
