श्रावण
श्रावण
1 min
363
आकाशी उठुनी दिसे
एक ध्रुव तारा
आनंदाने गगनी वाहे
बेधुंद होऊनी वारा
पावसाने भिजूनी जाई
अवखळसा किनारा
श्रावणाच्या चाहुलीने
हर्षे निसर्ग सारा
आनंदाने नाचे मोर
थुईथुई रानात
नव्याने चढे रंग
वृक्षातील पानापानांत
दरवळे दिशांत दाही
सुगंध मातीचा
समीप येई सण
श्रीगणेशाच्या भक्तीचा
अधीर होती पुष्पे
श्रीगणेश चरणी जाया
कृपाळू त्या देवाची
भक्तांवरी वेडी माया
